महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल रात्री अमरावती येथे आगमन झाले, तर आज सकाळी ते वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत येथे जात असताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
व्हिडीओ -प्रशिक मकेश्वर, तिवसा